सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (15:50 IST)

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी  प्रदूषण रोखण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व सरकारी वाहन इलेक्ट्रिक असणार. पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणला रोखण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पर्यावरण मंत्रालयाकडून प्रदूषण रोखण्यासाठी मोठे निर्णय घेतले जात आहे. या साठी शासनाने काही योजना देखील राबविल्या आहेत. पर्यावरण विभागाकडून माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणला कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय काही पावलं घेत आहे. या साठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सर्व शासकीय वाहनं इलेक्ट्रिक असण्याची मोठी घोषणा केली आहे. पर्यावरण विभागाकडून घेण्यात आलेला हा निर्णय 1 एप्रिल पासून लागू होण्याचे वृत्त आहे.