गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 एप्रिल 2022 (12:23 IST)

रत्नागिरीत लोटे एमआयडीसी केमिकल कंपनीमध्ये स्फोट, चार ठार

रत्नागिरी लॉट एमआयडीसी केमिकल कंपनीत स्फोट झाले आणि आग लागली.अग्निदमन शलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर अथक प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवले आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात लोटे एमआयडीसी कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूचे परिसर हादरले. या स्फोटात जखमी झालेल्यानां तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. 
 
या केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आगीचे लोळ दूरवर दिसत होते. घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या घटने  कारण अद्याप कळू शकले नाही.बॉयलर जास्त गरम झाल्यामुळे स्फोट झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. सकाळी 9 वाजेच्या सुमारास केमिकल कंपनीत युनिट मध्ये 2 स्फोट झाल्याचे रत्नागिरी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोटानंतर आग लागली. या स्फोटात जखमी कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात नेले असता चौघांना मृत घोषित केले. तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.