मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 जुलै 2024 (16:58 IST)

वरळी हिट अँड रन प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावात न येण्याचे फडणवीसांचे मुंबई पोलिसांना आदेश

devendra fadnavis
आज वरळी येथे एका बीएमडब्ल्यू कार ने दुचाकीवर जात असलेल्या दाम्पत्याला धडक दिली या मध्ये पत्नीचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय प्रसिद्ध पालघरचे उपनेते राजेश शहा यांना अटक केली आहे.

अपघाताच्या वेळी गाडी उपनेत्याचा मुलगा कार चालवत होता. अपघातानंतर आरोपी पळून गेला. या आरोपीं आपल्या बीएमडब्ल्यू कार ने दाम्पत्याला धडक दिली. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याची मुंबई पोलिसांना कोणत्याही राजकीय दबावाखाली न येण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणी कसून कारवाई करण्याचे त्यांनी मुंबई पोलिसांना म्हटले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी हिट अँड रन प्रकरणात म्हणाले, कोणालाही सोडले जाणार नाही. आरोपीवर कारवाई होणार. कायद्यासमोर सर्वांनां समान वागणूक दिली जाईल. घडलेली घटना अंत्यंत दुर्देवी असल्याचे ते म्हणाले.

आज सकाळी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास एट्रिया मॉल जवळ वरळी कोळीवाडा परिसरात स्थायिक असणारे नकवा कोळी दाम्पत्य मासे घेऊन लिलावासाठी डॉक कडे जाण्यासाठी दुचाकीवर निघाले असता वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कार ने मागून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. आणि ते दोघे कारच्या बॉनेट वर पडले.

या धडकेमुळे नवऱ्याने प्रसंगावधान राखत बॉनेट वरून उडी घेतली मात्र पत्नीला काही उतरता आले नाही आणि ती कार च्या बॉनेट बरोबर फरफटत गेली.या सर्व प्रकारामुळे कार चालक घाबरला आणि त्याने वेगाने गाडी पळवली. बोनेटसह फरफट गेलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली आणि तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून चालकाचा शोध पोलीस घेत आहे. आता या वर पीडितेला काय न्याय मिळतो हे पाहण्यासारखे आहे. 

Edited by - Priya Dixit