शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विद्युत खांबावर चढून एका शेतमजुराने आत्महत्या

वर्धा येथील एका शेतातील विद्युत खांबावर चढून शेतमजुराने आत्महत्या केली आहे. घटना सेलूकाटे जवळील केसलापूर शिवारात घडली असून, राजू भगवान रामटेके (वय 35) असं मजुराचं नाव आहे. 
 
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वर्धा येथील सावंगी पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या केसलापूर शिवारात ही  घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या इसमाने परिसरातील एका शेताच्या बाजूला असलेल्या सिमेंट खांबावर चढत विद्युत तार पकडून आत्महत्या केलीय.
 
जेव्हा शेतकरी पद्माकर बाळसराफ हे शेतात गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली होती,  त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांसह महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचताच विद्युत खांबावर लटकलेला मृतदेह खाली काढून,  शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेत विद्युत तार पकडल्याने मजुराचा चेहरा सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्रुप झाला आहे.