सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 31 जुलै 2022 (15:59 IST)

रात्रीच्या अंधारात बापानेच 3 वर्षाच्या मुलाला खड्ड्यात पुरलं

crime news
पालघर- विरारमध्ये जन्मदात्या बापानेच आपल्या 3 वर्षाच्या मुलाला जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निकेश वाघ असं या मयत चिमुकल्याचं आहे. गणेश वाघ असं वडिलांचं नाव असून त्याने चिमुकल्याचा दोन दिवसांपूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाल्याचं सांगत रात्रीच्या अंधारात एका झोपडीच्या शेजारी निकेशचा मृतदेह खड्डा करून पुरला.
 
हे कुटुंब जीवदानी पाडा परिसरात वास्तव्यास आहे. मुलगा आजारी होता आणि त्यात त्याचा आधीच मृत्यू झाल्याचं त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. निकेशला त्याच्या वडिलांनी रात्रीच्या अंधारात एका झोपडीच्या शेजारी खड्डा करून पुरला जेव्हा हे काही जणांच्या निदर्शनास आले तेव्हा ही माहिती विरार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी घटनास्थळी पोहोचून कुदळ आणि फावड्याने खड्डा करून पुरलेला मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता त्याला शवविच्छेदन अहवालासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे. 
 
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलाचा मृत्यू आजारपणामुळे झाला असल्याची माहिती वडिलांकडून मिळत असली तरी मृत्यू नेमका कसा झाला याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.