बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 26 जुलै 2022 (09:07 IST)

साताऱ्यात होणार प्रथम दर्जाचे ट्रामा केअर युनिट

सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार देऊन ठणठणीत बरे करण्यामध्ये प्राधान्य राहिले पाहिजे. याकरता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यासाठी साताऱ्यात प्रथम दर्जाचे शासकीय ट्रामा केअर सेंटर युनिट मंजूर झाले आहे. हे युनिट 50 बेडचे असून त्याकरता राज्य शासनाने सुमारे 13 कोटींचा निधी मंजूर केला आहे, लवकरच या कामाला प्रारंभ होईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान, सातारा जिह्यात 31 हेल्थ वलनेस सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी सात शहरात होणार आहेत, त्यांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रियेचे कामकाज सुरु आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी  दिली.
 
साताऱयात प्रथम दर्जाचे शासकीय ट्रामा केअर सेंटर बाबत बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, ट्रामा केअर सेंटर सातारा येथील आपल्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात आहे. परंतु त्यामध्ये शासनाच्यावतीने आणखी चांगल्या दर्जाची सेवा देण्याच्या हेतुने प्रथम दर्जाची शासकीय ट्रामा युनिट मंजूर करण्यात आले आहे. हे युनिट 50 बेडचे असणार आहे.