कर्नाटकचे माजी मंत्री म्हणतात, 'फडणवीस माझे गॉडफादर'
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे माझे गॉडफादर आहेत, असं कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोळी यांनी म्हटलं
जारकीहोळी कर्नाटक भाजपमधील काही नेत्यांमुळे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, आपण राजीनामा देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
रमेश जारकीहोळी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
"मला पुन्हा मंत्री होण्यात कोणताही रस नाही. फडणवीस माझे गॉडफादर असल्यनं त्यांची भेट घेतली. RSS आणि भाजपने जो सन्मान दिला, तो गेल्या 20 वर्षांत काँग्रेसमध्ये असताना मिळाला नाही," असं जारकीहोळी म्हणाले.
तसंच, काँग्रेस बुडतं जहाज असून, तिथे परत जाण्याचा विचार नसल्याचंही ते म्हणाले.