शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 एप्रिल 2022 (21:09 IST)

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक आणि जामीन; जाणून घ्या प्रकरण काय ?

vishwanath mahadeshwar
माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खार पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली आहे.त्यानंतर त्यांना लगेचच जामीनही मिळाला आहे.
 
राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिल्याने त्यांच्याविरोधात कलम 153अ बरोबरच विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून शनिवारी खार पोलिसांनी अटकही केली होती. यावेळी राणा दाम्पत्याची भेट घ्यायला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेत सोमय्या किरकोळ जखमी झाले होते.
 
किरीट सौमय्या हल्लाप्रकरणात माजी महापौर आणि काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडेश्वर यांच्यासह पोलिसांनी तीन नगरसेवकांना देखील अटक केली आहे. किरीट सोमय्या हल्ल्याप्रकणी पोलिसांनी चार जणांना पोलिस स्थानकात बोलवले आहे. यामध्ये विश्वनाथ महाडेश्वर, हाजी खान, चंद्रशेखर वैगणकर दिनेश कुबल यांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.