बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 14 मार्च 2024 (12:22 IST)

माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांची प्रकृती अस्वस्थ, रुग्णालयात दाखल

pratibha tai patil
social media
देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नव्हती. काल त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीनं कुटुंबीयांनी पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्यांचे वय 89 वर्ष आहे. त्यांनी भारताच्या पहिल्या  महिला राष्ट्रपती म्हणून 2007ते 2012 पर्यंत कार्यभार भूषविले. त्यांना पुण्यातील रुग्णालयात अस्वस्थता जाणवल्यामुळे दाखल केले असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहे.त्यांची निवड जळगाव विधानसभा मतदार संघातून झाली होती. त्यांनी २० वर्षे वेगवेगळ्या खात्याच्या मंत्रींची पदे सांभाळली आहे. त्या राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून जबाबदारी हाताळली. 1991 साली त्या अमरावटीतून लोकसभेच्या सदस्य झाल्या. त्या सध्या पूण्यात स्थायिक झाल्या आहे.  
 
 Edited by - Priya Dixit