सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (10:53 IST)

माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल

फोटो साभार-सोशल मीडिया 
भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. संजय धोत्रे हे गेल्या काही दिवसापासून अकोल्यातच आपल्या निवासस्थानी आराम करीत होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता  क्रमावर येत असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.