रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जुलै 2021 (22:55 IST)

राजू सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी गजाआड

सिने क्षेत्रातील नावाजलेलं नाव असलेल्या कलादिग्दर्शक राजू सापते यांनी पिंपरी-चिंचवडमधल्या वाकड इथं राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी राकेश मौर्य याला गजाआड करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. मोर्या यांच्या अत्याचारामुळे आत्महत्या करत असल्याचं सपाते यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगतिलं होतं. 
 
दिग्दर्शक राजू सापते यांनी 2 जुलैच्या रात्री राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं होतं.  राजू सापते यांनी युनियनचे पदाधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला होता.