पोटात दीड किलोचा गोळा
जिल्हा सामान्य रुग्णालयात (चिकलठाणा) सोमवारी एका महिलेच्या गर्भाशयातील दीड किलो वजनाचा गोळा काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयात किमान 1 लाख रुपयांचा खर्च लागला. या शस्त्रक्रियेत गर्भपिशवीही काढावी लागली. दीड तास शस्त्रक्रिया चालली. डॉ. कविता जाधव, भूलतज्ज्ञ डॉ. वैशाली जाधव, परिचारिका धारकर, वानखेडे, कर्मचारी अभिषेक आदींनी शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपळवे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांनी मार्गदर्शन केले.