शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (09:26 IST)

एस टी ची सवलत भारी मुलींना मिळाली मोफत पासची सोय

बातमी वाचून तुमचा गोंधळ झाला का ? मात्र बातमी खरी आहे. आपल्या राज्यातील  ग्रामीण भागातील असलेल्या बारावीपर्यंतच्या विद्यार्थिंनींना एसटीचा मोफत पास देण्यात येणार असा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये  राज्य परिवहन मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निर्णयाचा थेट फायदा 24 लाख विद्यार्थिनींना होणार आहे.
 
एसटीकडून आगोदर दहावीपर्यंतच्या विद्यार्थींनीना मोफत पास दिला होता. योजनेसाठी 44 कोटींचा खर्च अपेक्षित आहे असे सोमोर येते आहे. एसटीकडून विविध घटकांसाठी वेगवेगळ्या सवलती सुद्धा जाहीर आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अधीस्वीकृती धारक पत्रकार, अपंग यांचा समावेश देखील त्यांनी केला आहे, ग्रामीण भागातील आता 12 वी पर्यंत एसटी चा मोफत पास देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे, पूर्वी मुलींना फक्त 10 वि पर्यंत मोफत सवलत पास देण्यात येत होता, या योजनेमुळे 24 लाख विद्यार्थिंनींना फायदा होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना 44 कोटी रुपयांचा भार एसटी महामंडळाला सोसावा लागणार आहे. मात्र यामुळे ग्रामीण भागातील मुली शिकतील असा कयास शिवसेनेन आणि सरकारने लावला आहे.