रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (16:31 IST)

इयत्ता बारावीच्या परीक्षांचे हॉल तिकीट 22 जानेवारी पासून मिळणार

students
इयत्ता बारावीच्या परीक्षाचे प्रवेश पत्र येत्या सोमवार 22 जानेवारी पासून ऑनलाइनच्या माध्यमातून मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून असे सांगण्यात आले आहे. 
 
राज्य शिक्षण मंडळ च्या संकेतस्थळावरून हे प्रवेशपत्र मिळतील. शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवारी college login मध्ये download करून विद्यार्थी प्रवेशपत्र मिळवू शकतात. काहीही त्रुटी झाल्यास किंवा तांत्रिक अडचणी आल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावे. अशा सूचना माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहे. 
 
प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम यामध्ये बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक /प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायचे आहे. 
 
महाविद्यालयांनी बारावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्याथ्यर्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र  उघडताना काही त्रुटी आल्यास सदर प्रवेशपत्र गुगल क्रोम  मध्ये उघडावे. प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.
 
प्रवेश पत्र गहाळ झाल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय कडून पुन्हा सात प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असे लिहून विद्यार्थ्याला देण्यात येतील .
 
 Edited by - Priya Dixit