सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (15:14 IST)

शिवसेनेत बंड झालाय का? उदयनराजे यांचा खोचक सवाल

shivsena
भाजपा खासदार उदयराजे भोसले यांनी शिवसेनेतील बंडखोरी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. शिवसेनेत बंड झालाय का? असा खोचक सवाल उदयनराजेंनी केला. तसेच “शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे” असा प्रश्न उदयनराजेंनी केला. ते  पुण्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
 
उदयनराजे म्हणाले, “शिवसेनेत बंड झाला याबाबत मला काही माहिती नाही. बंड झालाय का? शिवसेना आहेच. शिवसेना कुणाची आहे यावरून वाद सुरू आहे.शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे. अरे वा, मग शिवसेना माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्र माझाच म्हटला पाहिजे. काही नाही म्हणायचं.”