गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (12:29 IST)

ह्रदयद्रावक ! राज्यात एकाच जिल्ह्यात 3 शेतकऱ्यांनी आपले प्राण संपविले

राज्यात सर्वत्र पावसाने उध्वस्त केले आहे. सतत कोसळणाऱ्या मेघसरींमुळे अतिवृष्टी झाल्याने शेतकरीचं  प्रचंड नुकसान झालं आहे. पावसामुळे सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील बीड मध्ये झाले आहे. येथे शेतकरींना अतिवृष्टीमुळे पीक खराब झाल्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. या मुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला आहे. दोन दिवसात 2 तरुण शेतकऱ्यांसह एका ज्येष्ठ शेतकरीने आत्महत्या केल्याचे वृत्त मिळत आहे. बीड जिल्ह्यातील तालुका केज, परळी आणि वडवणी येथे तिन्ही मध्ये 1 -1  शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

बाळासाहेब रामलिंगम गित्ते(25 राहणारे.सालेगाव. ता.केज ), सिद्धेश्वर धर्मराज फरताडे (34 राहणारे खळवट लिंबगाव. ता. वडवणी), आणि नागोराव धोंडिबा शिंदे (राहणारे देशमुख टाकळी. ता. परळी) असे या मयतांची नावे आहे. बाळासाहेब यांनी 19 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली ,तर सिद्धेश्वर यांनी 20 तारखेला सकाळी तर नागोबा शिंदे यांनी 20 ऑक्टोबर रोजीच संध्याकाळी आत्महत्या केली. या मुळे शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांवर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून अद्याप मदत मिळाली नाही. शेतकरी आर्थिक संकटाला सामोरी जात आहे. या मुळे त्यांना आपल्या कुटुंबियांना सांभाळणे जड जात आहे. अशा परिस्थितीत ते आत्महत्या करत आहे.  शासनाने लवकरात लवकर शेतकरींना मदत करावी. अशी आशा शेतकरी बाळगत आहे. त्यांच्या पुढे जगावं कसं असा मोठा प्रश्न उभारला आहे. शासना ने पुढाकार घेऊन त्यांची मदत करावी. जेणे करून ते आत्महत्या करण्याचा विचार करणार नाही.