1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (09:38 IST)

नांगरे पाटील यांची नाशिककरांना शिस्त लावणार, विशेष हेल्मेट, सिटबेल्ट बद्दल विशेष मोहीम पूर्ण सात दिवस

सोमवार म्हणजेच आज सकाळ पासून नाशिक शहर परिसरात हेल्मेट, सीटबेल्टचा वापर आवश्यक असून वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. शहरात वाहतूक नियमांची जनजागृती व हेल्मेट सक्तीबाबत सोमवार १३ मे पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी कडक शिस्ती साठी पूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे विशेष लक्ष देणार आहेत. बेशिस्त चालकांना ते व पोलिस अधिकारी शिस्त शिकवणार आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे नाशिककरांनी स्वागत केले आहे. 
 
बेशिस्त वाहन चालकामुळे निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. आणि हेल्मेट व सीट बेल्ट न घातल्यामुळे हि असंख वाहनचालक मृत्युमुखी पडले आहेत.नादर दिवसाआड एका व्यक्तीचा मृत्यू हेल्मेट, सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे होत आहे. याला वाहतूक नियम तोडणे हे कारणीभूत ठरत आहे. परंतू आजपासून वाहतूक नियम तोडल्याचे निदर्शनास आल्यास वाहनचालकांवर कारवाई होणार आहे, तसेच अपघाती मृत्यू झाल्यास सदर चालका विरूध्द कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. लाखो लोकांच्या या शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी हि मोहीम राबवली जात आहे. विनापरवाना वाहन चालवणे, मद्यप्राशन करून, वन वे तसेचे उलट दिशेने, ट्रिपल सिट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी, ओव्हरलोड वाहने चालविणे या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. या बरोबरच अल्पवयीन मुले वाहतूक नियमांचे उल्लंघन करतांना दिसत असून अल्पवयीन वाहनचालक व त्यांच्या पालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेट व सिटबेल्ट तपासणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.