रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (10:25 IST)

मैं यही हू, भुजबळ यांची माहिती

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेना प्रवेशाविषयी विचारले असता मैं यही हू असे तीनदा त्यांनी ठणकावून सांगितले आहे. शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू असतानाच भुजबळांनी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली. मागील काही दिवस भुगबळ पक्षापासून आणि पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर आहेत. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यात असताना त्यांनी या यात्रेकडे पाठ फिरवली. 
 
एवढंच नाही तर सुप्रिया सुळे यांनी भुजबळांना फोन केला पण भुजबळांनी तो फोन घेतला नाही. छगन भुजबळ यांना मी फोन केला होता, पण आजारी असल्यामुळे त्यांनी आपला फोन उचलला नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.