मी मदत करायला तयार आहे, नितेश राणे यांची ग्वाही
मुख्यमंत्र्याच्या या विधानावर भाजपा आमदार नितेश राणेंनी भाष्य केले आहे, नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलंय की, परवडणारी सिनेमागृह सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री बोलले, पण मी ते याआधीच माझ्या मतदारसंघात १ सिनेमागृह सुरु केलं आहे, २ वर्षापूर्वी देवगड येथे पहिला कंटेनरमध्ये सिनेमागृह सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने या स्टडी मॉडेल आणि अंमलबजावणीवर पुढे येऊन चर्चा करायला हवी. पण राजकारण पहिलं येतं, मी मदत करायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात परवडणारी सिनेमागृहे उभारण्यासाठी पुढाकार घेईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.