नाशिक झेडपीत काम असेल तर, आधी गाडी पार्किंगची सोय करा
नाशिक जुना त्र्यंबक ते अण्णाभाऊ साठे पुतळा दरम्यान सुरू असलेले पाईपलाईनचे काम व त्यामुळे मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी त्यातच जिल्हा परिषदेने वाहनांची संख्या पाहता प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या आवारात येणारे सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना बंदी घातली आहे.
दरम्यान जिपच्या या प्रशासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच दिवसभर पदाधिकारी, सदस्यांना वाहने बाहेर उभी करून पायी जिल्हा परिषद गाठावी लागली.
जिल्हा परिषदेत सोमवारपासून प्रशासकीय राजवट सुरू झाली असून प्रशासकांनी शिस्तीचे पर्व सुरू केल्याच्या भावनेला पुष्टी मिळेल असाच निर्णय पाहायला मिळत असल्यामुळे जिल्हा परिषद येणारे ठेकेदार, सदस्य तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वाहनांची गेल्या काही दिवसांपासून गर्दी होऊ लागली. परिणामी अधिकाऱ्यांना ही वाहने उभी करण्यास जागा नसल्याने वाहनतळ असा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान जिप समोरील मुख्य रस्त्यावर काम सुरू असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व बाबींवर पर्याय म्हणून प्रशासनाने खासगी वाहनांना बंदी घातली आहे. आज सकाळपासून मुख्य प्रवेशद्वाराच्या ताबा सुरक्षारक्षकांनी घेऊन प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. फक्त अधिकाऱ्यांच्या वाहनांना आत मध्ये सोडण्यात येत होते.