शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (09:27 IST)

हिंमत असेल तर समोरासमोर या, उदयनराजेंचे अजित पवार यांना आव्हान

udyan raje bhosale
सातारा दौऱ्यावर असताना सातारा एमआयडीसीचा विकास खंडणी, टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधीमुळे रखडला, अशी टीका अजित पवार यांनी केली होती.
 
त्यावर खासदार उदयनराजे यांनी हिम्मत असेल तर दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ, पहिली चौकशी माझी होऊ द्या, असे खुले आव्हान दिले आहे.
 
"माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की तो घरचा आहेर बोलले जाते. पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. जे कोण काय बोललं मला माहिती नाही. मंत्री, संत्री असतील; त्याचे मला काहीही घेणे देणं नाही." अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे.