सिडकोत बापाचाच कन्येवर बलात्कार तर आडगावला खासगी सावकाराकडून महिलेचा विनयभंग
नाशिक – नाशिक शहर परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिला शहरात असुरक्षितच असल्याचे स्पष्ट होत आहे. आज दोन गंभीर प्रकार उजेडात आले आहेत. सिडकोत जन्मदात्या बापानेच मुलीवर बलात्कार केल्याचे निदर्शनास आले आहे. तर, औरंगाबादरोड परिसरात खासगी सावकाराने महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला आहे. या दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
डीजीपनगरमध्ये जन्मदात्या बापाचा कन्येवर बलात्कार
बापलेकीच्या पवित्र नात्यास काळीमा फासल्याची घटना नाशकात समोर आली आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीवर निर्दयी पित्याने तब्बल सहा वर्ष बळजबरीने बलात्कार केला असून, संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिडकोतील डीजीपीनगर भागात घडलेल्या या घटनेप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आहेर (४६) असे संशयित पित्याचे नाव असून तो कारखाना कामगार आहे. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा संशयिताचा परिवार असून,हालाखिची परिस्थीती असल्याने पत्नीही मिळेल ते काम करून संसारास हातभार लावते. १ जानेवारी २०१६ रोजी पिडीतेचे लहान भाऊ, बहिण शाळेत तर आई कामावर गेलेली असतांना संशयिताची नजर आपल्या पोटच्या मुलीवर पडली. १६ वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत त्याने दमदाटी करीत बळजबरीने कुकर्म केले. इप्सित साध्य होताच संशयिताने पिडीतेस वाच्यता केल्यास बदनामी होईल अशी भिती घातल्याने मुलीने कुणालाही काही एक सांगितले नाही. मात्र त्यानंतर संशयिताची मागणी वाढल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली आहे. रात्रपाळीची सेवा बजावून आल्यानंतर दिवसा मुलीवर तो लैंगिक अत्याचार करीत होता. पत्नी लहान मुलांना शाळेत सोडून कामानिमित्त घराबाहेर पडल्याची तो संधी साधत होता. गेली सहा वर्ष बाविसी पार केलेल्या मुलीवर तो अत्याचार करीत होता. बापलेकीच्या पवित्र नात्यास संशयित वारंवार काळीमा फासू लागल्याने अखेर बापाच्या कृरकर्माचा पिडीत मुलीने भांडाफोड केला असून अधिक तपास उपनिरीक्षक सुनिल बिडकर करीत आहेत.
औरंगाबादरोडवर खासगी सावकाराची गुंडागर्दी
आर्थिक देवाण घेवाणीतून दोघांनी महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची घटना औरंगाबादरोड भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संगमनेर येथील एकास अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने खासगी सावकारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
निखील अशोक शहा व हर्षद कृष्णा केसेकर (रा.दोघे मालदाडरोड,संगमनेर जि.अ.नगर) अशी संशयिताची नावे असून केसेकर यास पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद रोडवरील इंदू लॉन्स भागात राहणाºया २२ वर्षीय विवाहीतेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पिडीतेचे कुटूंबिय आणि संशयित शहा यांच्या ामध्ये आर्थिक व्यवहार आहे. बुधवारी (दि.७) रात्री महिला घरी एकटी असतांना ही घटना घडली. शहा रात्रीच्या वेळी मित्र केसेकर यास सोबत घेवून आला होता. सासरच्या मंडळीने घेतलेल्या पैश्यांच्या जुनी देणी घेणीच्या वादाची कुरापत काढून त्याने हे कृत्य केले. तुझा नवरा नाही तर तू मला चालेल असे म्हणत त्याने विवाहीतेचा विनयभंग केला. तर दुसºया संशयिताने महिलेस व कुटूंबियास शिवीगाळ करीत घराच्या खिडकीची काच फोडून नुकसान केले. महिलेने गांभिर्य ओळखून तात्काळ पोलिसात धाव घेतल्याने पोलिसांनी संशयित हर्षल केसकर यास बेड्या ठोकल्या असून शहा पसार झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor