शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (15:55 IST)

जितेंद्र आव्हाडांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाडचा विवाहसोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला.
 
जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न पार पाडलं. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात अगदी मोजकेच पाहुणे उपस्थित होते. अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावतात परंतु आव्हाड यांनी साध्या पद्धतीने लग्न करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
 
कोणताही गाजावाजा न करता इतक्या साध्या पद्दतीने लावलेल्या लग्नाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र मुलीच्या विवाहसोहळ्यानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले. “२५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे,” असं त्यांनी म्हटलं.
 
जितेंद्र आव्हाडांचा जावई एलन पटेल नताशाचा बालमित्र आहे. सध्या एलन पटेल स्पेनमधली मल्टीनँशनल कंपनीत कामाला आहे.