रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (09:25 IST)

जुन्नर :शिवनेरीवर शिवजयंती सोहळा

shivaji maharaj
शिवजयंती निमित्त सोमवारी शिवनेरीवर शिवजयंती सोहळा रंगणार आहे. त्यामुळे शिवभक्तांच्या हजेरीने  शिवनेरी गड किल्ला दुमदुमणार आहे. त्याचवेळी राजकीय नेते, मंत्रीही हजेरी लावणार आहेत. मात्र, या दरम्यान, सर्वसामान्य शिवभक्तांना गडावरील प्रवेश बंद करून अनेक तास थोपविण्याचा प्रकार यंदा मोडीत निघणार आहे. त्यामुळे शिवभक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.
 
यंदा प्रथमच शिवजन्मस्थळाच्या उत्तरेला अभिवादन सभेचा मंडप उभारण्यात आला आहे. त्यामुळे सभा सुरू असताना शिवजन्मस्थळी सामान्य शिवभक्तांच्या येण्यास फारसे निर्बंध राहणार नाहीत. पोलिस आणि महसूल प्रशासनाने प्रथमच अभिवादन सभेचे ठिकाण बदलले आहे. दरम्यान, शिवजन्मोत्सव सोहळ््यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

गडावरील शिवजन्मोत्सव सोहळ््याचा कार्यक्रम मराठा सेवा संघाच्या वतीने होणार असून, शासकीय मानवंदना, मर्दानी खेळ, तसेच शिवचरित्रावरील प्रबोधनात्मक पोवाड्याचे सादरीकरण शाहीर राजेंद्र सानप करणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गणेश महाबरे यांनी दिली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवनेरीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
२८ ठिकाणी पार्किंग सुविधा
शिवनेरीवर येणा-या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जुन्नर शहरात २८ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभक्तांनी याच ठिकाणी आपली वाहने लावावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor