रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (14:57 IST)

ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी 3 सप्टेंबर रोजी ते कोल्हापूर दौऱ्यावर असतील. शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते जोतिबा दर्शनासाठी वाडी रत्नागिरीकडे रवाना होणार आहेत. जोतिबाचे दर्शन करून परत साडेअकरा वाजता कोल्हापूरमध्ये अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत.

राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या तैलचित्राचे अनावरण
दुपारी बारा वाजता ते राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरमध्ये बसवण्यात आलेल्या राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या पहिले चित्राच्या अनावरण करतील. दुपारी सव्वा एकच्या सुमाराचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी ते सदिच्छा भेट देणार आहेत.
विमानतळ संदर्भात बैठक होणार
 
दुपारी पावणे तीन वाजता कोल्हापूर विमानतळावर शिंदे बैठक घेणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.  याबाबत अधिक माहिती देताना महाडिक यांनी सांगितले की, कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण, नाईट लँडिंग, नवीन विमानसेवा, मुंबई आणि बंगळूरच्या विमानसेवेत सातत्य ठेवणे आदींबाबत निर्णय ज्योतिरादित्य शिंदे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेणार आहेत.