बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2020 (18:06 IST)

के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी पराभूत

नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्य मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांना मोठा धक्का बसला आहे. के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. 
 
नंदुरबारमधील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असलेल्या के. सी. पाडवी यांना त्यांच्या तोरणमाळ या बालेकिल्ल्यामध्येच धक्का बसला आहे. तोरणमाळ जिल्हा परिषद गटामध्ये पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा पराभव झाला आहे. शिवसेना उमेदवार गणेश पराडगे यांनी हेमलता पाडवी यांना पराभूत केले आहे. 
 
पाडवींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतविभागणी होऊन त्याचा फायदा शिवसेना उमेदवाराला झाल्याचे सांगण्यात येत आहे.