1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (20:39 IST)

कराड : भिडेंबद्दल ‘माथेफिरू’ हा शब्दही सौम्य- आमदार भाई जगताप

कराड : ज्या माणसाला स्वत:चे नाव लावायला लाज वाटते, तो कसा प्रेरणास्रोत होवू शकतो? भाजपनेच त्यांना गुरुजी बनवले आहे. त्यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे, अशी बोचरी टीका आमदार भाई जगताप यांनी ‘भिडे गुरुजी’ या नावावरून भाजपवर केली.
 
सातारा लोकसभा मतदार संघातील आढावा बैठकीसाठी काँग्रेसच्या सातारा जिल्हा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार जगताप हे कराड (जि. सातारा) दौ-यावर आहेत. त्यादरम्यान त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी शनिवारी सकाळी अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
 
आमदार जगताप म्हणाले, लाखो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन दीडशे वर्षानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या स्वातंत्र्यवर टीका करणारा हा माणूस. याला माथेफिरू हा शब्दही सौम्य झाला आहे. ज्या माणसाला स्वत:चे नाव लावायला लाज वाटते, तो कसा प्रेरणास्रोत होवू शकतो?

Edited By - Ratnadeep Ranshoor