गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जानेवारी 2024 (13:54 IST)

Kolhapur सख्ख्या बहिणींचा विहिरीत मृत्यू

water death
Kolhapur News कोल्हापुरहून एक धक्कादायक बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी येथे एक दुर्दैवी घटनेत शेतात गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी येथील भोसले यांच्या कुटुंबाला जणू कुणाची नजरच लागली. कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आराध्या सुरेश भोसले आणि आरोही सुरेश भोसले अशी या दोन सख्ख्या बहिणींची नावं आहेत. 
 
या दोघी बहिणी बुधवारी वडील सुरेश भोसले यांच्यासोबत शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेल्या असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. शेतात गेल्यानंतर दोघीं बहिणींना काही वेळाने सुरेश भोसले यांनी घरी जाण्यास सांगितले. काही वेळाने उसाला पाणी घातल्यावर आई अश्विनी घरी गेल्या मात्र त्यांना दोन्ही मुली घरी नसल्याचे समजले. त्यांनी घाबरून मुलींचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली.
 
घर आणि शेताच्या सगळीकडे शोध सुरु असताना विहिरीवर दोघी मुलींच्या चपला दिसल्या. तेव्हा ग्रामस्थांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता दोन्ही मुलीचे मृतदेह सापडले. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.