शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (08:29 IST)

ड्रग्ज प्रकरणात बहिणीवर आरोप झाल्यानंतर क्रांती रेडकर म्हणाल्या

मागील काही दिवसांपासून ड्रग्ज केस कारवाई प्रकरणावरून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करणारे राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. मलिकांनी समीर वानखेडे यांच्या मेहुणीच्या ड्रग्ज प्रकरणावरुन समीर वानखेडे (यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या आरोपावरून समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे. यानंतर आता वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

त्यावेळी बोलताना क्रांती रेडकर  म्हणाल्या की, ‘नवाब मलिक यांनी जे ट्वीट केलंय. त्यावरुन प्रसारमाध्यमांना अनेक प्रश्न पडलेत हे मला ठाऊक आहे. या प्रकरणात माझ्या बहिणीला सातत्याने लक्ष्य केलं जातं आहे. आमच्या कायदेशीर टीमच्या सल्ल्यानुसार, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे यावर मत प्रदर्शन करणं, योग्य होणार नाही. माझी बहिण कायदेशीररित्या नवाब मलिक यांच्या ट्वीटला उत्तर देईल. तसेच, या केसशी समीर वानखेडे यांचा काही संबंध नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
 
या दरम्यान, ‘क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा दिनानाथ रेडकर यांच्यावर जानेवारी 2008 मध्ये गुन्हा (FIR) दाखल झाला असेल. मी सप्टेंबर 2008 मध्ये सेवेत आलो आहे. 2017 साली माझे क्रांतीशी लग्न झाले आहे. मग 2008 च्या प्रकरणाशी माझा काय संबंध?, असं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.