शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जुलै 2023 (21:26 IST)

किरगिझस्तान (रशिया) कमी दरात विमान तिकिट काढून देण्याच्या आमिषाने सात लाखांची फसवणूक

नाशिक :– विमान तिकीट कमी दरात काढून देण्याचे आमिष दाखवून एका इसमाने दहा जणांकडून सुमारे सात लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
 
प्रतीक दादाजी पगार (रा. रामनगर, मोरे मळा, हनुमानवाडी, पंचवटी) असे दहा जणांची फसवणूक करणार्‍या भामट्याचे नाव आहे. याबाबत दिनेश सुभाष खैरनार (वय 44, रा. साईशक्ती रो-हाऊस, आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) व इतर दहा पालकांच्या मुलांना   किरगिझस्तान (रशिया) येथून भारतात परत येण्यासाठी परतीचे विमान तिकीट कमी दरात काढून देतो, असे आमिष आरोपी प्रतीक पगार याने त्यांना दाखविले.
 
दि. 10 मे ते 14 जुलै 2023 या कालावधीत आरोपी पगार याने फिर्यादी व इतर दहा जणांकडून सुमारे 6 लाख 86 हजार रुपयांची रक्कम घेतली; मात्र परतीचे विमान तिकीट काढून न देता पैसेदेखील परत दिले नाहीत. त्यानंतर फिर्यादी खैरनार व इतर पालकांनी आरोपी पगारकडे पैसे मागितले असता त्याने शिवीगाळ व दमदाटी करून फसवणूक केली.
 
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आरोपी प्रतीक पगार याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत करीत आहेत.