शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (19:07 IST)

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये कधी येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले मोठे अपडेट

ladaki bahin yojna
महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1 जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत आता पर्यंत 5 हफ्ते भरण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हफ्त्याची वाट आतुरतेने बघत आहे. 

राज्य सरकार जुलै 2024 पासून लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये पाठवत आहे. या महिलांच्या खात्यात या योजनेचा डिसेम्बर महिन्याचा हफ्ता लवकरच महिलांच्या खात्यात पाठवले जाणार आहे. 
राज्य सरकार ने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात योजनेच्या पाचव्या हफ्त्याची म्हणजे नोव्हेंबर महिन्याची आगाऊ रकम दिली होती. आता लाभार्थी महिलांना सहाव्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. 

पुढचा हफ्ता कधी येणार यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे की मला सभागृहाला आश्वासन द्यायचे आहे कोणतीही शन्का घेऊ नका, आम्ही सुरु केलेल्या योजना बंद होणार नाही.लाडक्या बहिणींनी आपल्या प्रेमाचा वर्षाव महायुतीवर करून विजय मिळवून दिला आहे.  हे सत्र सम्पतातच डिसेम्बरचा हफ्ता बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल. लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाही. 
 
लाडक्या बहिणींना' 2100 रुपये कधी मिळणार?
महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान रकमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जातील. असे फडणवीस म्हणाले होते. मात्र वाढलेली रकम अदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पानंतर वाढवून मिळणार आहे. सध्या लाभार्थी महिलांच्या खात्यात हफ्त्याचे 1500 रुपये मिळणार आहे. 
Edited By - Priya Dixit