गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (15:45 IST)

जमीन खरेदी गैरव्यवहार: खडसे दोषी ? ईडीने कोर्टाला हे सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे निरीक्षण अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात नोंदविले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे हे मंत्रिपदी असताना पदाचा गैरवापर करत कुटुंबातील सदस्यांना फायदा करून दिला असेही ईडीने सांगितले. त्यामुळे खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन देता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
 
शिवसेना-भाजप युती सरकार असताना एकनाथ खडसे महसूलमंत्री होते. त्या काळात त्यांनी पुणे येथील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये करण्यात आला होता. ३१ कोटींचा भूखंड फक्त ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. रेडिरेकनरपेक्षा खूपच कमी दर लावून जमिनीची खरेदी केल्याचा आरोप होता.