शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (21:08 IST)

लातूरच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची सोलापूरच्या हॉटेलमध्ये आत्महत्या; काय आहे नेमके प्रकरण

suicide
सोलापुर : सोलापुरातील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. लातूरमधील एका अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापुरातील हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. स्नेहलता प्रभू जाधव असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. स्नेहलता या लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी होत्या. स्नेहलता यांनी हॉटेलच्या रुममध्ये साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील एका अधिकाऱ्याच्या पत्नीने मुलांचे लग्न तोंडावर असताना आत्महत्या केली आहे. मुलाच्या लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी आलेल्या स्नेहलता यांनी रविवारी (दि. 27) लातूर येथील हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी त्यांनी नातेवाईकाला फोन करून आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी  सांगितले होते. स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे १८ डिसेंबरला लग्न होते. लग्नाच्या खरेदीसाठी त्या, त्यांचे पती व नातेवाईक कर्नाटक येथील चडचण येथे गेले होते. शनिवारी (दि. 26) रात्री उशीर झाल्याने ते सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमीत्त लातूरला गेले. त्यानंतर दुपारी स्नेहलता यांनी आपल्या लातूर मधील नातेवाईकाला फोन करत जोरजोराने रडत आपण ‘आत्महत्या करणार’ असे सांगितले होते.
 
नातेवाईकांनी स्नेहलता यांना समजून सांगत या घटनेची माहिती सोलापुर येथील नातेवाईकांना तातडीने कळवली होती. जेमतेम दहा ते पंधरा मिनिटांनी सोलापुरातील नातेवाईक हॉटेलवर गेल्यानंतर हॉटेलचा दरवाजा बंद आढळला. यामुळे नातेवाईकांनी दरवाजा तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर स्नेहलता साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना लगेच उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. स्नेहलता यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Edited by : Ratnadeep Ranshoor