शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (08:06 IST)

Latur Earthquake लातूर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं

earthquake
Latur was once again shaken by an earthquake लातूर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. येथील निलंगा तालुक्यातील हासोरी-बु गावात 1.6 रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. रात्री 8 वाजून 57 मी हा भूकंपाचा धक्का बसलाय.
 
गेल्या तीन दिवसापूर्वीच 2.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. आज पुन्हा 1.6 रिस्टर स्केलचा धक्का बसलाय. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. गावकरी भीतीनं पोटी रस्त्यावर उतरलेत.
 
30 सप्टेंबर 1993 मध्ये लातुर किल्लारीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाला ३० वर्ष पुर्ण झाली आहेत. किल्लारी येथे 6.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला. यामध्ये 52 खेडेगावातील तीस हजारांच्या आसपास घरे आणि आधारभूत सोयीसुविधा कायमच्या नष्ट झाल्या होत्या. यानंतर पुन्हा आलेल्या भूकंपाने येथील नागरिक भयभीत झाले आहेत.