रविवार, 22 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (15:49 IST)

संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी : दरेकर

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “संजय राऊत यांची वक्तव्ये बेताल आणि बेजबाबदार आहेत. आज तर थेट न्यायालयाने काय केलं पाहिजे हेच ते सांगत आहेत. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी” असं प्रविण दरेकर म्हणाले. 
 
संजय राऊत यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर टिपण्णी केली होती. हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी आहे. ही जमीन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता. महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.
 
त्याबाबत प्रविण दरेकर म्हणाले, “आम्हाला सत्ता गेल्याच दुःख नाही, कारण भाजपचे दोनवरुन 300 पर्यंत खासदारांची संख्या पोहोचली आहे. त्यामुळे त्याची चिंता राऊतांनी करु नये. संजय राऊतांनी कोर्टावर असं भाष्य करणे हा कोर्टाचा अवमान आहे. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. सर्वोच्च न्यायव्यवस्था असताना त्यांच्यावरच असे आरोप करणे चुकीचं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे”.