लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आज लष्कर प्रमुखपदाची पदभार स्वीकारणार
भारताचे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आज (30 एप्रिल) पदभार स्वीकारणार आहेत.
मूळचे नागपूरचे असलेले जनरल मनोज पांडे हे चौथे मराठी अधिकारी भूदलाच्या प्रमुखपदी विराजमान होत आहेत. सलग दुसऱ्यांदा हा मान मराठी सुपुत्राला मिळाला आहे.
पांडे हे डिसेंबर 1982 ला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि त्यानंतर इंडियन मिलिटरी अकदमीमार्फत (IMA) लष्करात अधिकारी झाले.
सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे आजच (30 एप्रिल) निवृत्त होत असताना, त्याचदिवशी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हा पदभार स्वीकारणार आहेत.