Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या असून देवेंद्र फडणवीस आता राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहे. तसेच 7 डिसेंबर आजपासून महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत होणार आहे, ज्यामध्ये नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील आणि विधानसभा अध्यक्षांची निवड करतील. ही तीन दिवसीय परिषद असणार आहे.प्रोटेम स्पीकर कालिदास कोळंबकर निवडणुकीनंतर निवडून आलेल्या 288 उमेदवारांना शपथ देतील. धुळ्यात ईव्हीएम छेडछाडीबाबत शिवसेना यूबीटी काढणार कँडल मार्च.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
10:56 AM, 8th Dec
धुळ्यात ईव्हीएम छेडछाडीबाबत शिवसेना यूबीटी काढणार कँडल मार्च
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपावरून सोमवारी 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिवसेने उबाठाच्या वतीने कँडल मार्च काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा ....
10:55 AM, 8th Dec
फ्रँचायझी मिळवून देण्याचे आमिष दाखवून जोडप्याची 80 लाखांची फसवणूक
ठाणे जिल्ह्यातील एका जोडप्याला पेमेंट बँक फ्रँचायझी उघडण्याचे आमिष दाखवून 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे