बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (14:55 IST)

नाग‍रिकत्व कायद्याविरोधात 24ला महराष्ट्र बंद

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार, 24 जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादर येथील आंबेडकर भवनात गुरूवारी वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीनंतर आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बंदची घोषणा केली.
 
वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनीच बंदच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले.