बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 24 मे 2020 (13:56 IST)

येत्या 15 जून पर्यंत शाळा सुरु होण्याची शक्यता : वर्षा गायकवाड

कोरोनाचा सगळ्यात मोठा फटका शिक्षण व्यवस्थेला बसला आहे. तर शिशु आणि माध्यमिक गटाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्यात आले आहे. तर आता या विद्यार्थ्यांच्या शाळा केव्हा सुरु होणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा येत्या 15 जूनपासून सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. रेड झोन वगळता इतर भागांमध्ये शाळा सुरु करण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत, असे वर्षा गायकवाड यांनी संगितले आहे.
 
विद्यार्थ्यांना सम विषम रोलनुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलवण्याचा विचार केला जात आहे. दुसरा पर्याय म्हणजे प्रत्येक पर्यायी दिवशी वर्गातील विद्यार्थ्यांच्या तुकडीला कॉल करून त्यांना सांगायचं की, कोणत्याही परिस्थितीत सामाजिक अंतर ठेवणं. एका डेस्कवर फक्त एका विद्यार्थ्याला परवानगी देण्यात येईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. 
 
तर शाळा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर हानिकारक परिणाम होईल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी सरकारनं नवीन मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) तयार केली आहे. परंतु मुंबईतील रेड झोनमध्ये असलेल्या इतर शाळांमदध्ये याचा विचार होऊ शकत नाही.
 
दरम्यान कोरोनामुळे सर्वच ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पालक देखील शाळा सुरु झाली तरी मुलांना शाळेत पाठवण्यात थोडेसे घाबरतील. कारण मुलांकडून सामाजिक अंतरण पाळणे काहीसे कठीण आहे. मुलं खेळण्याच्या नादात एकमेकांना स्पर्श करू शकतात. त्यामुळे अनवधानाने संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य सरकार या साऱ्याचा विचार करून योग्य निर्णय कसा घेणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार