शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (16:04 IST)

सणासुदीला महाराष्ट्र अंधारात?

नागपूर : कोळसा खाणींच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस व महानिर्मितीच्या ढिसाळ नियोजनामुळे महाराष्ट्रातील वीज केंद्रांना कोळसा मिळेनासा झाला आहे. बहुतांश वीज केंद्रांमध्ये  तीन ते चार दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. एकूण गरजेच्या 10 टक्के कोळशाचा वापर करण्याचे निर्देश दिले. पाऊस थांबल्यानंतर उष्णतेत वाढ होऊन विजेची मागणी वाढली तर ती पूर्ण करणे या परिस्थीतीत कठीण आहे. दुसरीकडे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रासह अन्य राज्यांना मागणीनुसार कोळशाची आयात वाढविण्याचा सल्ला दिला आहे.
 
देशात कोळशाची टंचाई विचारात घेता केंद्र सरकारने एकूण गरजेच्या 10 टक्के विदेशी कोळशाचा वापर करण्याचे निर्देश दिले होते. आता केंद्राने देशभरातील स्थितीचा आढावा घेत सर्व वीजनिर्मिती कंपन्यांना गरजेनुसार आयात वाढविण्याचा सल्ला दिला आहे.
 
एकूण वापराच्या 30 टक्क्यांपर्यंत कोळसा आयात करण्याची परवानगी देण्याचे संकेत केंद्राने दिले आहे. दुसरीकडे राज्यातील देशी कोळशाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. महानिर्मितीच्या दुर्लक्षामुळे मान्सूनपूर्व स्टॉक होऊ शकला नाही. आता पावसामुळे कोळशाचा पुरवठा प्रभावित झाला आहे. अशीच स्थिती राहिली तर मान्सूननंतर वाढलेली विजेची मागणी पूर्ण करणे कठीण जाईल.