रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (07:54 IST)

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात

देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांतील नेते ट्विटरपासून ते रस्त्यापर्यंत या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधत आहेत. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या शतकाचा उल्लेख केला.
 
ठाकरे म्हणाले, ''पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. आपण विराट कोहली-सचिन तेंडुलकरची सेंच्युरी पाहिली. मात्र आता पेट्रोल-डिझेलचे शतक पाहत आहोत.'' सध्या प्रेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी नव्हे एवढ्या वाढल्या आहेत. राजस्थानातील श्रीगंगानगर नंतर बिकानेरमध्येही पेट्रोल 100 रुपयांच्याही पार गेले आहे. पेट्रोल 100.01 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.09 रुपये प्रति लिटरवर गेले आहे.
 
राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संयुक्त समितीकडे पाठवलेले एक विधेयक आहे (शक्ती फौजदारी कायदा सुधारणा) तसेच विधानसभेत एक प्रलंबित (महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये)  विधेयक आहे. तसेच चार प्रस्तावित विधेयके असून दोन प्रस्तावित अध्यादेश आणि एक अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिली. पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. 
 
मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि आता परत महाविकास आघाडीचे हे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे.या अधिवेशनात 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मांडणार आहेत. 
 
कोरोना अजून गेला नाही. तो परत वाढू लागला असून तो कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य सुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाची दुसरी लाट वाढू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना करत आहोत. जेथे रुग्ण वाढले आहेत, तेथे उपचाराची सुविधा देण्यात येत आहे. कोरोना काळात धारावी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाले. कोरोना काळात जी जी पावले उचलली त्याबद्दल जनतेला वेळोवेळी माहिती दिली आहे.
सीमाप्रश्नी महाराष्ट्राने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे. मराठा आरक्षणप्रश्नी विरोधी पक्षनेत्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास न होता कर्जमुक्तीचा लाभ दिला. कोरोना काळातही कर्जमुक्तीची रक्कम वाटण्यात आली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.