बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (21:14 IST)

'ती' सर्व कारणे महाविकास आघाडी सरकारनं पूर्ण केली : चंद्रकांत पाटील

राज्यात राष्टपती राजवट लागू करण्यासाठी जी कारणे लागतात ती सर्व कारणे महाविकास आघाडी सरकारनं पूर्ण केली आहेत असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत.
 
राज्यातील सरकारी नोकर भरतीच्या पेपरफुटीची आणि परीक्षांमधील घोटाळ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांच्या मागणीचे समर्थनही चंद्रकांत पाटील यांनी केलंय. 
 
कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आरोग्य विभाग, म्हाडा आणि आता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळे यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत पाहोचत आहेत. त्याची चौकशी करण्यास त्याच्यावर असलेली संस्था पाहिजे. जे आरोपी तेच न्यायाधीश असे होऊ शकत नाही. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी योग्य आहे असे सांगितले.