शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (08:33 IST)

राज्य सरकारकडून दुसऱ्यांदा पोलीस दलात मोठे फेरबदल

राज्य सरकारने दुसऱ्यांदा पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अमिताभ गुप्ता यांची पुण्याच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनव देशमुख पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक असतील, तर डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी बदली झाली आहे. 
 
लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबियांना खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी शिफारस पत्र दिल्यामुळे अमिताभ गुप्ता अडचणीत आले होते. यानंतर अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. यानंतर अमिताभ गुप्ता यांची चौकशी करून समितीने त्यांना निर्दोष ठरवलं होतं. त्यानंतर त्यांना प्रधान सचिव पदावर रुजू करण्यात आलं. 
 
महाविकासआघाडी सरकारने राज्यातल्या २२ पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याआधी काहीच दिवसांपूर्वी जवळपास ४० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
 
बदली झालेले अधिकारी 
१) अमिताभ गुप्ता- पोलीस आयुक्त, पुणे
२) विनीत अगरवाल- प्रधान सचिव (विशेष) गृहविभाग, मुंबई
३) अनुप कुमार सिंह- उपमहासमादेशक, गृहरक्षक दल, मुंबई
४) संदीप बिश्णोई- अपर पोलीस महासंचालक, रेल्वे, मुंबई 
५) डॉ. के. व्यंकटेशम- अपर पोलीस महासंचालक ( विशेष अभियान), मुंबई 
६) मनोज कुमार शर्मा- पोलीस उपमहानिरिक्षक, सुरक्षा महामंडळ, मुंबई 
७) जयंत नाईकनवरे- पोलीस उपमहानिरिक्षक, व्हीआयपी सुरक्षा, मुंबई 
८) निशित मिश्रा- अपर पोलीस आयुक्त (संरक्षण व सुरक्षा), मुंबई शहर
९) सुनिल फुलारी- अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपूर शहर 
१०) रंजन कुमार शर्मा- पोलीस उपमहानिरिक्षक (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), पुणे 
११ ) शिवदीप लांडे- पोलीस उपमहानिरिक्षक, दहशतवादविरोधी पथक मुंबई
१२) मोहित कुमार गर्ग- पोलीस अधिक्षक, रत्नागिरी
१३) विक्रम देशमाने- पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण 
१४) राजेंद्र दाभाडे- पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग
१५) सचिन पाटील- पोलीस अधिक्षक, नाशीक ग्रामीण
१६) मनोज पाटील- पोलीस अधिक्षक, अहमदनगर
१७) प्रविण मुंढे- पोलीस अधिक्षक, जळगाव
१८) अभिनव देशमुख- पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण
१९) दिक्षीतकुमार गेडाम- पोलीस अधिक्षक, सांगली 
२०) शैलेश बलकवडे- पोलीस अधिक्षक, कोल्हापूर 
२१) विनायक देशमुख- पोलीस अधिक्षक, जालना
२२) राजा रामास्वामी- पोलीस अधिक्षक, बीड 
२३) प्रमोद शेवाळे- पोलीस अधिक्षक, नांदेड 
२४) निखील पिंगळे- पोलीस अधिक्षक, लातूर 
२५) जयंत मिना- पोलीस अधिक्षक, परभणी
२६) राकेश कलासागर- पोलीस अधिक्षक, हिंगोली
२७) वसंत जाधव- पोलीस अधिक्षक, भंडारा 
२८) प्रशांत होळकर- पोलीस अधिक्षक, वर्धा
२९) अरविंद सावळे- पोलीस अधिक्षक, चंद्रपूर
३०) विश्वा पानसरे- गोंदिया 
३१) अरविंद चावरीया- पोलीस अधिक्षक, बुलढाणा
३२) डी.के. पाटील भुजबळ- पोलीस अधिक्षक, यवतमाळ
३३) अंकित गोयल- पोलीस अधिक्षक, गडचिरोली