मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (11:09 IST)

Manik Rao Gavit passed away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिक राव गावित यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु होते. उपचाराधीन असताना त्यांची प्राण ज्योत मालवली. रविवारी त्यांच्यावर नवापूर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. माणिकराव गावित हे काँग्रेसकडून अनेकदा लोकसभेवर निवडून आले होते. गावित यांच्या निधनाने काँग्रेसचा मार्गदर्शक नेता हरपला .

त्यांनी काँग्रेस चे सरकार असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. प्रदीर्घ काळ आदिवासी समाजाचे नेतृत्व केले.माणिकराव गावित यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.