बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (08:03 IST)

बेरोजगारीमुळे तरूणांची लग्ने ठरत नाहीत- शरद पवार

sharad pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेरोजगारीवरून केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकारवर हल्लाबोल करत भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. रोजगाराच्या संधींचा तुटवडा असल्य़ाने लग्नासाठी योग्य तरुणांना वधू मिळत नसल्याने सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. असे विधान केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाच्या ‘जनजागर यात्रे’ला हिरवा झेंडा दाखवताना त्यांनी पुण्यात सरकार वर टिका केली.
आपल्या भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की ग्रामिण भागात बेरोजगारीची झळ सगळ्यात जास्त बसत आहे. बेरोजगारी मुळे लग्नायोग्य तरूणांची लग्ने ठरत नाहीत. त्यांच्याकडे नोकऱ्या नसल्यामुळे त्यांना कोणी वधू देण्यास तयार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशा तक्रारी अधिक प्रमाणात आढळतात.
भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार वर टिका करताना ते म्हणाले, “दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी काही समस्या तयार केल्या जात आहेत. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नसल्याने ते असे करत आहेत.” असे पवार म्हणाले, नोकरीच्या संधी वाढवणारी धोरणे स्वीकारण्याऐवजी समाजात फूट पाडण्याचे काम भाजप करत असल्याचे सांगून त्यांनी टीकास्त्र सोडले.
Edited by : Ratnadeep Ranshoor