रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (15:06 IST)

कागलमध्ये लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली सुरू असलेले बांधकाम आमदार हसन मुश्रीफ यांनी बंद पाडले

hasan mushrif
कागलमध्ये लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम आमदार हसन मुश्रीफ यांनी बंद पाडले.कागल-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर श्री.लक्ष्मीदेवी मंदिराच्या पाठीमागील बाजूस उंच डोंगरावर हे काम सुरू होते.नगरपालिकेच्यावतीने दोन नोटीसा देऊनही ही कंपनी ऐकत नव्हती.बेकायदेशीररित्या वन विभागाची जमीन खोदून हजारो झाडांची कत्तल केली जात आहे, तरीही फॉरेस्टवाले झोपलेत काय? असा सवाल सवाल मुश्रीफ यांनी विचारला.यावेळी केडीसीसी बँकेची संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नगरपालिका पक्षप्रतोद नितीन दिंडे, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक संजय ठाणेकर, इरफान मुजावर आदी उपस्थित होते.
 
याबाबत अधिक माहिती अशी, कागलमध्ये लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली बेकायदेशीर बांधकाम सुरु करण्यात आले आहे. बांधकामासाठी परवानगी न घेता बांधकाम केल्याप्रकरणी याआधी कंपनीला दोन नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही कंपनीने काम सुरुचं ठेवले. आज अखेर बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी आमदार हसन मुश्रीफ यांनी भेट देत हे बांधकाम बंद पाडले. यावेळी वनविभागाला जबाबदार धरत फॉरेस्टवाले झोपलेत काय? असा सवाल उपस्थित केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor