सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (17:33 IST)

18 महिन्याच्या मुलीसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पतीचे महिन्याभरापूर्वी कोरोनामुळे निधन झाले.दोन दिवसांपूर्वी माहेरी आलेल्या शिक्षिकेचा आपल्या 18 वर्षाच्या चिमुकलीसह मृतदेह एका विहिरीत सापडला. लहानग्या चिमुकलीला घेऊन अवघे आयुष्य कसे काढायचे त्यामुळे पतीच्या विरहामुळे पत्नीने आपल्या अवघ्या 18 महिन्याच्या चिमुकलीला घेऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याची हृदयद्रावक घटना बीड मध्ये घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. 
 
शिक्षिकेच्या पदावर असलेली या महिलेचे पती देखील शिक्षकच होते.महिन्याभरापूर्वी पतीचे कोरोनामुळे निधन झाले.पती वियोग सहन न करू शकल्यामुळे महिलेने आपल्या 18 महिन्याच्या मुलीला घेऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.आशा सुंदर जाधवर वयवर्षे 22 आणि शाम्भवी जाधवर वय 18 महिने असे या मयत झालेल्या माय लेकीची नावे आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.या मायलेकींचे मृतदेह विहिरीतून काढले तेव्हा आईच्या कडेवर बाळ आणि बाळाचा हात आईच्या हातात होता.हे दृश्य बघून सर्वांचे डोळे पाणावले.पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनास पाठविले.नंतर सकाळी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.सकाळी या मायलेकींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.अद्याप आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.