गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (16:46 IST)

सुपरसॉनिक मोड विकसित होणार, मुंबई-पुणे प्रवास फक्त १३ मिनिटांत

सुपरसॉनिक मोड विकसित करणाऱ्या अमेरिकन कंपनीने महाराष्ट्रासोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या.  या करारानुसार वाहतूक व्यवस्थेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पुणे दरम्यान तीन तासाचा प्रवास केवळ वीस मिनिटात होणार आहे.राज्य सरकार आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने  यासंदर्भातील करार केला आहे. व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यात १००० किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास होणार असून  मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास फक्त १३ मिनिटांत पूर्ण होईल असा दावा कंपनीने केलाय. 

 हे तंत्रज्ञान राबवण्याआधी या मार्गावर, तासाला ५ हजार प्रवासी संख्या असणे देखील आवश्यक आहे.हायपर लूप ही मेट्रोप्रमाणे कॉलमवर उभारली जाते.यासाठी अंदाजे भाडे असणार आहे १२०० रूपये असण्याची शक्यता आहे. हायपरलूपचं आणखी एक महत्वाची आणि आवश्यक बाब म्हणजे हे अंतर सरळ रेषेत असावं लागतं. मुंबई आणि पुणे दरम्यान अंतर कमी आहे, सरळ रेषेत हायपरलूपचं काम होणार आहे का हे देखील पाहता येईल, याचा अहवाल ६ आठवड्यात येणार आहे.