रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (12:46 IST)

दारूसाठी केला लहान भावाचा खून, आरोपी भावाला अटक, नांदेड हादरलं !

नांदेड शहरातील चिरागगल्ली परिसरात एका तरुणाने आपल्या लहान भावाचा निर्घृण खून केल्याने नांदेड हादरलं आहे. अरुणसिंग बालाजीसिंग ठाकूर असे या मयत तरुणाचे नाव आहे. तर याला मारणाऱ्या आरोपी भावाचे नाव जुगनूसिंग ठाकूर असे आहे. आरोपी भावाला अटक केली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जुगनूने 23 फेब्रुवारी रोजी आपल्या धाकट्या भावाकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. पण मयत अरुण ने पैसे देण्यास नकार दिल्यावर संतापून आरोपी जुगनूने अरुणला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अरुणचा जागीच मृत्यू झाला. 

या प्रकरणी आई गंगाबाई ठाकूर यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी जुगनूसिंग यांचावर गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात दाखल केले असून त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. ही घटना समजतातच परिसरात खळबळ उडाली आहे.