1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नागपूर: मुसळधार पावसाचा फटका (बघा फोटो, व्हिडिओ)

नागपुरात जोरदार पाऊस  (बघा व्हिडिओ)

 
जोरदार पावसामुळे नागपूर शहरात पूर (बघा फोटो)

उपराजधानी नागपुरमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूरमधील अनेक भागांमधील वीजपुरवठादेखील खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या कामकाजालादेखील बसला आहे. आठवडाभर ओढ दिल्यानंतर काल रात्रीपासून वरुणराजानं नागपूर शहराला झोडपण्यास सुरुवात केली. काल रात्री नागपुरात पावसाची संततधार सुरू होती. सकाळी आठनंतर पावसाचा जोर वाढला. नागपूरकरांना आज फार काळ सूर्याचं दर्शनही घडलं नाही.

दिवस सुरू होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं. अनेकांच्या घरांमध्येही पाणी शिरल्यानं सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले.

काल सकाळी 8 ते आज सकाळी 8 या कालावधीत नागपुरात 61.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पुढील आठवडाभर नागपुरमध्ये पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.